नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर 9175431411
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. ५ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी “माहिती अधिकार सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या संदर्भातील शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय कार्यालये व सार्वजनिक प्राधिकरणांना सप्ताह साजरा करण्याबाबत सर्वसाधारण आदेश जारी करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये देखील माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येईल या कालावधीत जनजागृतीपर उपक्रम, मार्गदर्शन आणि माहिती प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.
शासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना माहिती अधिकार कायद्याबाबत अधिक माहिती मिळून पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराला बळ मिळण्यास मदत होणार आहे.
