अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.
एकलव्य आदिवासी आघाडीच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर
राहुरी : मांजरी गावातील आदिवासी समाजातील अतिक्रमणधारकांच्या जागा त्यांच्या नावे करण्यासह पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. एकलव्य आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजयजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे आणि जिल्हा महासचिव संदीप बर्डे यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून मांजरी गावातील २८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव राहुरी पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने पंचायत समिती कार्यालयात उपस्थित होते.
यावेळी एकलव्य आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे, जिल्हा महासचिव संदीप बर्डे, महिला तालुकाध्यक्ष संगीता बर्डे, तालुकाध्यक्ष पोपट माळी यांच्यासह युवा कार्यकर्ते चंदू गायकवाड, सागर माळी, राधाकिसन माळी, राजेंद्र पवार, पोपट ठाकर, सोन्याबापू ठाकर, बाप्पू बर्डे, कचरू माळी, राजू हनुमंत, बाबासाहेब माळी, शुभम माळी, विनायक बर्डे, ताई ठाकर, गोरख माळी, सूर्यकांत गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, विजय माळी, हिराबाई मोरे, भाऊराव ठाकर, संतोष माळी, मिराबाई बर्डे, वसंत मोरे, मनीषा बर्डे, भागवत हनवत आदी महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.
अतिक्रमणधारकांच्या जागा नावावर होणे आणि घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव पुढे गेल्याने मांजरीतील संबंधित लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर या प्रक्रियेला मिळालेली गती ही आदिवासी समाजासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
