जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

चोपडा येथील भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या ट्रक आणि गाड्या अतिक्रमण करून लावल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणण्यात आणि व्यापाऱ्यांना दुकान लावण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या अतिक्रमणामुळे मार्केटमधील रोजच्या कामकाजात गंभीर व्यत्यय येत असून शेतकरी आणि व्यापारी यांनी नगरपालिका व ट्रॅफिक पोलिसांकडे तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मार्केटमध्ये मोठ्या ट्रक अनधिकृतरीत्या लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या गाड्या आत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर भाजीपाला विक्रीसाठी आणता येत नसून त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनाही आपली जागा मोकळी करून व्यवस्थित दुकान लावणे अशक्य झाले आहे. या स्थितीमुळे संपूर्ण मार्केट व्यवहारात अडथळे निर्माण झाले आहेत.

शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अतिक्रमण करून ट्रक लावणाऱ्या मालकांवर आता नगरपालिका आणि ट्रॅफिक पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशा अनधिकृत ट्रक तात्काळ हटविण्यात याव्यात. मालकांवर दंड, वाहन जप्त करणे किंवा इतर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही असे अतिक्रमण करण्याचे धाडस करणार नाही.

शेतकऱ्यांची मागणी आहे की, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी. अन्यथा शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान वाढत राहील. नगरपालिका व ट्रॅफिक पोलिसांकडून लवकरात लवकर ठोस आणि कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!