
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील मोठा कुंभारपाडा व लहान कुंभार पाडा जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने धानोरा केंद्राची शिक्षण परिषद पार पडली.
अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री उदय बोरसे होते प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील रनाळे बीटचे विस्तार अधिकारी श्री सतीश कदमबांडे धानोरा केंद्राचे विस्तार अधिकारी श्री जयंत चौरे केंद्र मुख्याध्यापक श्री सुभाष बर्डे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राकेश पाडवी हे उपस्थित होते.

गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील यांनी विविध प्रशासकीय बाबींवर सूचना करत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ कशी करावी या विषयी मार्गदर्शन केले धानोरा बीटाचे विस्तार अधिकारी श्री चौरे साहेब यांनी गटकार्य व अध्ययन निष्पत्ती वर मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर इखणकर छत्रसिंग वळवी महेश गावित यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व आभार श्री किरण घरटे यांनी मानले.
