

कोल्हापूर प्रतिनिधी
सुभाष गजानन जाधव पत्रकार प्रदीप जाधव यांचे वडील वय 72 हे 26 जुलै 2024 पासून राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. यासंदर्भात 28 जुलै रोजी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.परंतु अद्याप त्यांचा कोणताही शोध लागलेला नाही.त्यामुळे आज अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी समाज महासंघ जिल्हा कोल्हापूर यांचा वतीने करवीर पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हंटले आहे की नाथपंथी डवरी समाजाचे बांधव श्री सुभाष गजानन जाधव हे 26 जुलै पासून राहत्या घरात बेपत्ता आहेत त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही तरी आपण या घटनेबाबत वयक्तिक लक्ष्य घालून सदर व्यक्तीचा जलद गतीने तपास करून शोध लावण्यास सहकार्य करावे हि विनंती. श्री किशोर शिंदे यांनीही याबाबत माहिती घेऊन तपास जलद गतीने केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवराम डवरी, माजी नगसेवक महेश जाधव,पत्रकार प्रदीप जाधव,सुनिल डवरी,संजय डवरी,बळवंत दवरी,कोंडीबा डवरी, मुरलीधर जगताप,रामचंद्र डवरी, शिवतेज संघटना जिल्हाध्यक्ष शिवाजी गिरिगोसवी, राहुल जाधव,श्रीनिवास काटवे, उपस्थित होते.
