नवापूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

नंदुरबार जिल्हा (प्रतिनिधी जितु जयस्वाल)

नवापूर शहरातील लिंमडावाडी भागातील एका किराणा दुकानात चोरट्याने डल्ला मारत 40 ते 50 हजार रुपयाचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे.

नवापूर शहरातील दिलीप स्वीट ह्या होलसेल किराणा दुकान असून दिनांक ७ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान दुकानाचे शटर फोडून चोरी करण्यात आली. सदर चोरी किराणामाल व रोकड असा एकूण 40 ते 50 हजाराचा मालाची चोरी झाल्याचे दुकान चालक दिलीप किसनचंद कोदवाणी यांच्या लक्ष्यात आले, त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या दुकान वाल्यांना बोलावून चोरी झाल्याची माहिती दिली समोरच असलेल्या कापड दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये रात्री तीन वाजेच्या सुमारास दोन चोरटे अंधाराचा फायदा घेत दुकान फोडली मग त्या दुकानातील माल घेऊन जाताना दिसत आहेत लिमडावाडी भागात एका मागून एक होत असलेला चोरीच्या घटनेमुळे व्यापारी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाच महिन्या पूर्वी लिंबडावाडी येथील नेमीचंद अग्रवाल यांच्या कापड दुकानात चोरी झाली होती आज त्यांच्या दुकानासमोर दुसऱ्या दुकानात चोरी झाली आहे म्हणून हे तेच चोर तर नाही ना? असा प्रश्न या भागातील व्यापारी उपस्थित करीत आहेत. पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!