जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक क्षमता वाढविण्याबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.

या सत्रात फिजिओथेरपिस्ट डॉ. अभिलाषा मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक हालचाली, योग्य व्यायाम, शरीराचा समतोल, लवचिकता, योग्य बैठक व दैनंदिन जीवनातील शारीरिक सक्रियतेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांकडून विविध सोप्या शारीरिक हालचाली व व्यायाम करून घेत त्यांना शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले.

लहान वयातच योग्य व्यायाम आणि शारीरिक हालचालींची सवय लागल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास व कार्यक्षमताही वाढण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनात पर्यवेक्षक निलेश पवार तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!