जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.
रावेर : सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर यांच्या वतीने शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी रावेर तालुकास्तरीय शासकीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा शिक्षक व क्रीडा व्यवस्थापक गोकुळ महाजन, एल. एस. ठाकूर, स्नेहल पाटील, युवराज महाजन, राहुल राजेंद्र, प्रशांत तायडे, ज्ञानेश्वर जांभळे तसेच हर्षाली पवार मॅडम यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक युवराज माळी यांनी केले, तर प्रतीक खराले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक व क्रीडा व्यवस्थापकांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या नियोजन व सहकार्यामुळे स्पर्धांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
