
शहापूर तहसील, मंडळ कार्यालय, तलाठी सजा केली दफ्तर तपासणी..
शहापूर /दिपक विशे
तालुक्यातील उत्कृष्ट शेती व शेतकरी असे समीकरण ओळखले जाणारे गाव म्हणजे वासिंद जवळील दहागाव !
आज या शेती प्रदान गावात ऍग्री स्टॅग योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या सातबारा आधार लिंक जोडणी संदर्भात उपजिल्हाधिकारी मंजुषा जायेभाये यांचा शेतकऱ्याच्या शेत-बांधावर एग्री स्टॅग मार्गदर्शन स्पर दौरा आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्या दरम्यान दहागाव येथील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रमुख अतिथी यांनी केला. येथील शेतकऱ्यांना ऍग्री स्टॅग विषयी माहिती देऊन, भविष्यात येणाऱ्या शेतकी योजना शेतकऱ्यांपर्येंत या सातबारा आधार लिंक च्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने पोहोचण्यास मदत होईल.
तसेच ऍग्री स्टॅग च्या माध्यमातून शेतकरी ओळख प्रमाणपत्र आपणास मिळणार असून येणाऱ्या काळात अनेक नवनवीन योजनांचा लाभ हा शेतकरी लाभार्थ्यांना या ओळख प्रमाणपत्र च्या जवळ असण्याने मिळणार आहेत.

आपणांस शेती संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आपण थेट आपल्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्याशी संपर्क साधुन शेती समस्यांचे निवारण करून घेऊ शकता, असे उपजिल्हाधिकारी मंजुषा जायेभाये यांनी या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना संबोधित केलं.
तसेच आदिवासी वनपट्टे धारक सुद्धा या योजने अंतर्गत आपले शेतकरी ओळख प्रमाणपत्र तयार करून अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतात.
शहापूर तालुका तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय , तलाठी कार्यालय यांचीही दफ्तर तपासणी उपजिल्हाधिकारी यांनी या दौऱ्या वेळी केली असून अधिकारी, कर्मचारी यांनी कामात कार्येतत्परता ठेऊन शेतकऱ्यांची कामे वेळेत पुर्ण करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित महसूल यंत्रणेला दिले.
या कार्येक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती उपजिल्हाधिकारी मंजुषा जायेभाये यांच्या बरोबरच शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुले यांनी सुद्धा शेतकरी वर्गाला शेती व महसूल संबंधी चांगले मार्गदर्शन केले.
या कार्येक्रमात विशेष म्हणजे शेतकरी वर्गाने प्रमुख अतिथींचा स्वागत शेतातील ताजा भाजीपाला बांबूने तयार केलेल्या टोपलीमध्ये सजावट करून एक आगळीवेगळी भेट स्वरूप देऊन स्वागत केलं.
यावेळी शहापूर मंडळ अधिकारी शशिकांत बनकर, या कार्येक्रमाचे प्रमुख सूत्रधार तलाठी सजा दहागाव-सारमाल तलाठी राधा खुळे तसेच कृषी विभागाचे हेमंत पारधी, या ऍग्री स्टॅग शिबिराचे प्रमुख आयोजक स्थानिक शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष तथा पत्रकार रविंद्र गोतरणे, जेष्ठ शेतकरी गुरुनाथ देसले, आगरी सेनेचे कृष्णा परटोळे, कृषी पुरस्कृत शेतकरी संजय पाटील, प्रकाश देसले, अनंता देसले, ग्रामपंचायत ऑपरेटर संजीवनी वेखंडे, प्रेम देसले, तहसील कार्यालयीन शिपाई मिलिंद राऊत, उपसरपंच संजय पवार पो पा जयराम पवार, माजी उपसरपंच यशवंत देसले, ह भ प बाळाराम देसले, विठ्ठल पवार, नारायण डोंगरे, भगवान डोंगरे, सचिन मांडवे, रामचंद्र धानके, ग्राम. कर्मचारी जयराम गायकवाड, योगेश पवार यांच्या सह अनेक स्थानिक शेतकरी, महिला शेतकरी या शेत- बांधावरील ऍग्री स्टॅग शिबिरास उपस्थित होते.
