नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान.

* या पुस्तक मेळाव्याच्या कार्यक्रमात भवानीपाड्याचा सरपंच ताई श्रीम. सोनाली सुशांत वळवी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दीपक वळवी हे उपस्थित होते. या पुस्तक मेळावेचे उद्घाटन गावातील सरपंच श्रीम. सोनाली सुशांत वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचण्याची सवय लागावी म्हणून अनेक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. त्यात गोष्टींचे, थोर पुरुषांची, वैज्ञानिक पुस्तके, आत्मकथनाची पुस्तके, बडबड गीतांची पुस्तके ई. इत्यादी पुस्तकांची मांडणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या सर्व पुस्तकांचे वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश रामभाऊ गावित यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री. राजेंद्र यादवराव बिरारीस यांनी केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!