जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विद्यार्थ्यांसाठी योग सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी हेमलता पाटील व चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे मार्गदर्शन केले.

योगामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच मनाची एकाग्रता, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाभ्यास केला.

कार्यक्रमास मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!