जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव येथील जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित यांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव मुक्तांगण हॉल, जुना नेरी नाक्याजवळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

संस्थेचे चेअरमन सरफराज सिकंदर तडवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे उपस्थित राहणार आहेत.

या वार्षिक सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात येणार असून, चालू आर्थिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचाही सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सभेस उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक सभासदाला १ हजार रुपये बैठक भत्ता रोख स्वरूपात देण्यात येणार आहे.

सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून सभेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन सरफराज सिकंदर तडवी, सचिव सुरेखा लष्करे, संचालक मंडळ तसेच शाखा व्यवस्थापक ज्ञानदेव पाटील, लिपिक सुभाष भोळे आणि चंद्रकांत सावंत यांनी केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!