जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव : प्रभू श्री विश्वकर्मा भगवान पूजन दिनाचे औचित्य साधत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त जळगावात १७ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभू श्री विश्वकर्मा भगवान यांचे विधिवत पूजन, सत्यनारायण कथा व आरतीसोबतच कारागीर बांधवांना ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतील विविध लाभांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा), महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जगदीश पाटील, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ तसेच विश्वकर्मा योजना जिल्हा समन्वयक मयुर भदाणे, संजय विसपुते, प्रशांत वाडेकर, शीतल वानखेडे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत रोडेकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभू श्री विश्वकर्मा भगवान यांचे पूजन, सत्यनारायण कथा व आरती पार पडली. त्यानंतर आयोजित मार्गदर्शन सत्रात प्रशिक्षण, टूलकिट, प्रमाणपत्र, प्रोत्साहनपर लाभ, आर्थिक सहाय्य आणि कर्जप्रक्रिया याबाबत कारागिरांना सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी प्रशिक्षण पूर्ण होऊनही टूलकिट न मिळणे, प्रमाणपत्र प्रलंबित असणे, प्रोत्साहन भत्ता किंवा अन्य लाभ न मिळणे, तसेच अर्ज करूनही प्रशिक्षण सुरू न होणे अशा विविध अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामोद्योग अधिकारी जगदीश पाटील यांनी योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या बँकिंग अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम सुतार, संजय सांगोळे, दिलीप सोनवणे, निलेश सोनवणे, अमोल जाधव, राजेंद्र निकम, सुनील देवरे, गोविंद जाधव, हेमंत भालेराव, जितू सोनवणे, सचिन काळे, गौरव रुले, रामकृष्ण शिरसाट, संजय वाघ आदी समाजबांधवांनी सहकार्य केले.

सूत्रसंचालन : प्रमोद रुले

आभार प्रदर्शन : श्रीराम जाधव

समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून प्रभू श्री विश्वकर्मा भगवान यांच्या पूजनासोबतच कारागीर बांधवांना ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!