श्राव्या देसले व मयुरेश धनगर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

चोपडा तालुका प्रतिनिधी – जितेंद्र राजेंद्र शिंदे.

चोपडा येथील अमर संस्थेच्या वतीने मातृहृदयी कै. सुशीलाताई गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक अशोक निळकंठराव सोनवणे यांच्या हस्ते सरस्वती माता व कै. सुशीलाताई पाटील यांच्या प्रतिमापूजनाने तसेच दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दीपक जोशी, संचालक डी. बी. पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अशोक साळुंखे, बालमोहन विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना पाटील आणि प्रा. डॉ. सुधीर चौधरी उपस्थित होते.

दुपारी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निमगव्हाण केंद्राचे केंद्रप्रमुख दीपक पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून चोपडा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अंजली बर्गे तसेच आर. सी. पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. डी. आर. पाटील उपस्थित होते.

या वेळी प्रा. डॉ. डी. आर. पाटील म्हणाले, “आई ही मुलाच्या आयुष्याला आकार देणारी पहिली गुरू असते. मुलांनी आपल्या अंगी असलेले सुप्त गुण व कौशल्ये कोणत्याही बंधनात न अडकवता मोकळेपणाने जगासमोर आणावीत.” गट विकास अधिकारी अंजली बर्गे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचे परीक्षण के. टी. महाजन, दिनेश नारायण बाविस्कर, प्रा. झुलाल हिलाल करंकाळ आणि सुजय सुधाकर धनगर यांनी केले.

*स्पर्धेचा सविस्तर निकाल*

*प्रथम गट* 

– *प्रथम* : श्राव्या अभिजीत देसले (चावरा इंटरनॅशनल स्कूल, अकुलखेडा) – रोख रक्कम ₹३,००१, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

– *द्वितीय* : शिवराजे पंकज शिंदे (प्रताप विद्या मंदिर, चोपडा) – रोख रक्कम ₹२,००१, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

– *तृतीय* : नक्षत्रा दिगंबर पाटील – रोख रक्कम ₹१,००१, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

*द्वितीय गट*  

– *प्रथम* : मयुरेश महेंद्र धनगर (थेपडे माध्यमिक विद्यालय, म्हसावद, ता. एरंडोल) – रोख रक्कम ₹३,००१, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

– *द्वितीय* : प्रीतम गणेश नागरे – रोख रक्कम ₹२,००१, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

– तृतीय: पर्वणी प्रसाद वैद्य – रोख रक्कम ₹१,००१, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन मयुरेश्वर सोनवणे यांनी तर आभार प्रीती सरवैय्या यांनी मानले. प्रा. डॉ. सुधीर चौधरी यांच्या अथक परिश्रम व मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरीत्या राबविण्यात आली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!