विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

धुळे – दिवाळीच्या तोंडावर धुळे शहरात भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. शहरातील साक्री रोडवरील कुमार नगर परिसरात छापा टाकून विभागाने तब्बल ३ लाख २६ हजार रुपयांचा संशयित तूप आणि मिठाईचा साठा जप्त केला आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर धुळे अन्न सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत दोन ठिकाणांवरून साठा जप्त करण्यात आला.

मेसर्स गायत्री ट्रेडर्स या दुकानातून ४६३ किलो गायीचे व म्हशीचे संशयित तूप जप्त करण्यात आले आहे. या तुपाची अंदाजे किंमत ३ लाख ८ हजार रुपये आहे.

तर मेसर्स रिअल गृह उद्योग येथून १५८ किलो बुंदी आणि बुंदीचे लाडू ताब्यात घेण्यात आले आहेत. या मिठाईची किंमत सुमारे २५ हजार २०० रुपये आहे.

भेसळीच्या दाट संशयावरून हा सर्व साठा जप्त करण्यात आला असून, जप्त केलेले अन्नपदार्थ तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यावसायिकांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!