प्रतिनिधी : किरण पाटील
मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी सिताराम श्रावण सोनवणे यांचे १६ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी आपल्या मुलांकडे व्यक्त केलेली अखेरची इच्छा त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण करत समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श निर्माण केला.
सिताराम सोनवणे यांनी, “माझ्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी आंब्याची झाडे लावावीत आणि माझ्या अस्थी त्या झाडांजवळ ठेवाव्यात,” अशी इच्छा आपल्या मुलांना सांगितली होती. त्यांच्या इच्छेनुसार तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमानिमित्त सोनवणे परिवाराने शेतात आंब्याची दोन रोपे लावली. तसेच राखेचे नदीत विसर्जन न करता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ती झाडांजवळ ठेवण्यात आली.
परंपरेसोबत पर्यावरणाची सांगड घालत सोनवणे परिवाराने केलेल्या या उपक्रमातून “मृत्यूनंतरही निसर्गाच्या रूपाने स्मृती जिवंत राहू शकतात,” असा प्रेरणादायी संदेश समाजाला मिळाला आहे. लावलेली ही आंब्याची झाडे सिताराम सोनवणे यांच्या आठवणींचे प्रतीक ठरणार असून भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गाचे अमूल्य वरदान ठरणार आहेत.
“प्रत्येकाने स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करावा,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी रवींद्र सोनवणे, महेंद्र सोनवणे, जितेंद्र सोनवणे, चुनीलाल सोनवणे, बाळू सोनवणे, भास्कर सोनवणे, सुनील सोनवणे, प्रकाश सोनवणे, संजय सोनवणे, सुधाकर सोनवणे, गणेश सोनवणे, नितीन सोनवणे, योगेश सोनवणे, सुरज सोनवणे, मनोहर सोनवणे, राज सोनवणे, साई सोनवणे, शिव सोनवणे, कौतिक सोनवणे, सोपान सोनवणे, रामदास सोनवणे यांच्यासह सोनवणे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
