मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; शालेय शिक्षण समिती व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कार्यक्रम उत्साहात
घनसावंगी : तालुक्यातील मौजे वडीरामसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय शिक्षण समिती व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक भागवत सर, शिक्षक खेडकर सर, शिंदे सर, खांडेभराड सर यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सतीश साबळे, उपाध्यक्ष राम पवार, सरपंच दत्तात्रय वराडे, उपसरपंच त्रिंबक साबळे, तसेच अनिरुद्ध साबळे, शंकर चांदुडे, गोवर्धन जाधव, रोहिदास साबळे, गौरव साबळे, राजेंद्र डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक साहित्याच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने मिळण्यास मदत होणार असून, शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सकारात्मक होण्यास हातभार लागणार आहे. कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
