विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
घनसावंगी तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यातील अनेक भागांत पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून खरीप हंगामातील पिके हातची जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
युवा शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १ लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. तसेच मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास ४८ तासांनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या
घनसावंगी तालुका १४ दिवसांत कोरडादुष्काळग्रस्त जाहीर करावा.
शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्यावे.
रब्बी हंगामासाठी पिककर्जासाठी २५% अग्रिम विमा देण्याची मागणी.
एनडीआरएफ निकषापुढे जाऊन आपत्कालीन मदत द्यावी.
पिकविमा कंपनीने एकाच वेळी अंतिम व्याप्ती प्रसिद्ध करून प्रति हेक्टरी ६० हजार रुपये प्रोत्साहन द्यावे.
जालन्यात उपोषणास बसलेल्या गजानन उगले यांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी.
