जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे व अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ दरदंले यांनी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, स्वच्छता, सुरक्षितता, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध भौतिक सुविधा तसेच शाळेतील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली.

विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेच्या विविध शैक्षणिक, पर्यावरणपूरक व नाविन्यपूर्ण उपक्रमांची तसेच गुणवत्तावाढीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती डॉ. अनिल झोपे व डॉ. जगन्नाथ दरदंले यांना दिली. याप्रसंगी शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून शाळेतील गुणवत्ता, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!