जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

संचनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ/जालना महानगरपालिकेतील कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, महापालिकेतील नगरसेवकांमधील सातत्यपूर्ण वादविवाद आणि भांडणांमुळे शहराच्या विकासाला मोठा फटका बसत असल्याचा घणाघात खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी केला आहे. जालना महानगरपालिका तात्काळ बरखास्त करावी, अशी ठाम मागणी आपण थेट मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि. १७) जुना जालन्यातील मामा चौकातील स्वास्तिक भोजनालयात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार डॉ. काळे यांनी हा इशारा दिला.

विकासाला खिळ, नागरिकांमध्ये नाराजी

महानगरपालिका ही शहराच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य केंद्र असते. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे, दर्जेदार रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर नागरी प्रश्नांवर महापालिकेने प्रभावीपणे काम करणे काँग्रेसचे अपेक्षित असते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!