जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

घनसावंगी : बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते विनोद आढे यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष घावे, या मागणीसाठी घनसावंगी बंजारा ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी शासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान बंजारा समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलनस्थळी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हारिश राठोड यांचा इशारा

“शासनाने वेळेत बंजारा समाजाच्या विविध मागण्यांची दखल घेतली नाही, तर यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. समाजाच्या मागण्यांसाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने संघर्ष सुरूच ठेवण्यात येईल.”

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!