जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
आयटीआय परिसरातील कचरा संकलन रॅम्प हलवण्याच्या मागणीसाठी अभाविपच्या वतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची तातडीने दखल घेत घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांना कचऱ्याचा त्रास होऊ नये यासाठी आरोग्य विभागाला आवश्यक सूचना दिल्या, तसेच रॅम्प स्थलांतराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
रॅम्प परिसरात कचरा साचू न देणे, नियमित स्वच्छता व धूरफवारणी करणे तसेच आयटीआय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी नगरसेवक विशाल भोळे आणि नगरसेविका अंकिता पाटील यांच्यासह उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख व निलेश तायडे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि नागरिकांच्या स्वच्छतेशी संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू. 🙏
