जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स (PCWJ)च्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशन व सन्मान सोहळ्याचे आयोजन १२ सप्टेंबर २०२६ रोजी बोरीवली पश्चिम येथील अटल स्मृती उद्यानात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या अधिवेशनाला देशभरातील विविध राज्यांतून पत्रकार व जर्नलिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

कार्यक्रमास PCWJचे चेअरमन डॉ. सैय्यद खालिद क्वींस, सीता ट्रस्ट अहिल्यानगरचे CEO डॉ. शंकर घनश्यामदास अन्दानी तसेच PCWJ मुंबई-महाराष्ट्रच्या महासचिव श्रीमती शशि दीप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी PCWJ गुजरातच्या सचिव श्रीमती तुलसी अनिल मिश्रा यांना ‘युवा पत्रकार सन्मान’ प्रदान करण्यात आला. तसेच मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व गिरीश थापर आणि पुणे येथील मेजर गणेश शर्मा (BSF) यांच्या हस्ते त्यांना ‘समाज गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान मुंबईतील PCWJच्या पत्रकारांच्या टीमने देशभरातून आलेल्या पत्रकार व मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल घेत विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय अधिवेशन व सन्मान सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!