जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने आणि जळगाव महानगराध्यक्ष अशोक सीताराम लाडवंजारी यांच्या मान्यतेने गणेश भागवत पाटील यांची जळगाव महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचे नियुक्तीपत्र महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या स्वाक्षरीने पाटील यांना प्रदान करण्यात आले. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

नियुक्तीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, पक्ष निरीक्षक भास्करराव काळे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, प्रदेश सरचिटणीस एजाजभाई मलिक, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, युवक महानगराध्यक्ष विनायक पाटील, महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, महानगर उपाध्यक्ष किरण राजपूत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नियुक्तीनंतर गणेश भागवत पाटील यांचे पक्षातील सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले. आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि महानगरातील कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी आपण सक्रियपणे काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांमध्ये एकनाथ खडसे व भास्कर काळे यांची उपस्थिती यापूर्वीही नोंदली गेली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!