अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.

शिर्डी : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या पूजेसाठी विकल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये बनावट वस्तू मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूजा साहित्यातील खऱ्या प्रसादासोबत चक्क प्लास्टिकचे बदाम मिसळून विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच शिर्डी नगरपालिकेच्या पथकाने संबंधित दुकानावर कारवाई करत दुकानदाराला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पूजा साहित्यातील प्लास्टिकचे बदाम आढळून आल्याची माहिती आहे.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे. देशभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अशा प्रकारे बनावट साहित्य विकले जात असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पूजा साहित्याच्या नावाखाली बनावट वस्तूंची विक्री होत असल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. या घटनेनंतर शिर्डीतील पूजा साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाईचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!