जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.
जळगाव : दैनिक नवराष्ट्रच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘नवराष्ट्र सन्मान सोहळा, जळगाव २०२६’ मध्ये रावेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. संगीताताई भास्कर महाजन यांना ‘आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
रावेर शहराच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या सन्मानामुळे रावेरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, शहरवासीयांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

या पुरस्कार सोहळ्यास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री. राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर सौ. दीपमालाताई काळे, जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भास्करभाऊ महाजन, रविंद्र महाजन, संजय माळी, शुभांगी महाजन आणि नत्थु महाजन उपस्थित होते.
सौ. संगीताताई भास्कर महाजन यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल रावेर शहरातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
