जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील, विशेष वृत्तांत.

वाकड/रावेत, दि. १३ सप्टेंबर २६: पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही लोखंडी कोयते बाळगल्याप्रकरणी रावेत आणि वाकड पोलिसांनी दोन तरुणांवर कारवाई केली. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी लोखंडी कोयते जप्त करून संबंधितांविरोधात शस्त्र कायद्यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

रावेतमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून कोयता जप्त

रावेत पोलिसांनी सुरेश कुमार धर्मपाल नेहरा (वय ४४, रा. सक्सेस विंसडोअर टॉवर, रावेत) याच्यावर कारवाई केली. ११ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.३५ वाजता नवीन बीआरटी रोडवरील साउथ अप हॉटेलजवळ, मस्के वस्ती येथे तो लोखंडी कोयता जवळ बाळगून उभा असल्याचे पोलिसांना आढळले. त्याच्याकडून सुमारे ८०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार २ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शस्त्रे अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई असताना आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकडमध्ये १८ वर्षीय तरुणाकडून कोयता

दुसरी कारवाई वाकड पोलिसांनी केली. स्वराज कैलास ससाणे (वय १८ वर्षे ४ महिने, रा. मिलन मेडिकलजवळ, शिव कॉलनी, वाकड) याच्यावर कारवाई करण्यात आली. १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता शिव कॉलनी, दत्तमंदिर रोड येथे तो लोखंडी कोयता बाळगून आढळला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही त्याने आदेशाचा भंग करून सुमारे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता कब्जात ठेवला होता. गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असताना तो पोलिसांच्या ताब्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी आर्म्स अॅक्ट कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!