डॉ. जगदीश पाटील स्कूलचा ‘Letter of Appreciation’ देऊन गौरव

जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.

मुक्ताईनगर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने PADA CARE उपक्रमांतर्गत पाड्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये गणित विषयाच्या पुस्तकांचाही समावेश आहे.

डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस.ई. स्कूल, मुक्ताईनगरचे प्राचार्य डॉ. योगेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन पुस्तके उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या योगदानाबद्दल निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने शाळेला ‘Letter of Appreciation’ प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी निर्वाणा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल किशोर मेढे यांनी प्राचार्य डॉ. योगेश सोनवणे व शाळेचे आभार मानले. तसेच अभय शिरतुरे व अक्षय मेढे उपस्थित होते.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुढे आणण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमातून ‘शिक्षणातून परिवर्तन आणि सहकार्याने सक्षम भविष्य’ हा सकारात्मक संदेश देण्यात आला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!