विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
पहाटे पोलिसांची धडक कारवाई; विक्रीसाठी जनावरे बाळगल्याचा आरोप
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे गोवंशासह जनावरांची अवैधरित्या कत्तल करून त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने जनावरे बाळगल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.१५ वाजता कुरेशी मोहल्ला परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कुरेशी मोहल्ल्यातील संशयितांच्या राहत्या घरात गोवंशासह जनावरांची अवैधरित्या कत्तल करून विक्रीसाठी बाळगल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली.
या प्रकरणी अकिल शेख अय्युब कुरेशी (वय ३२) आणि असलम शेख अय्युब पिंजारी (वय ३०), दोघेही रा. कुरेशी मोहल्ला, नशिराबाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत गिरणारे करीत आहेत.
दरम्यान, संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील कलम २७५, ३२५ तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम, १९७६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास नशिराबाद पोलिसांकडून सुरू आहे.
