विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जामनेर : जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या फेरबदलात रायगड येथून जळगाव जिल्ह्यात हजर झालेले पोलीस निरीक्षक निवृत्ती भिमराव बो-हाडे यांची जामनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे जामनेर पोलीस ठाण्याची जबाबदारी आता पोलीस निरीक्षक बो-हाडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर आतापर्यंत प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सपोनि स्वप्नील शिंदे यांना प्रभारी पदाच्या कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या या बदल्यांनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने हजर होऊन त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जामनेर पोलीस ठाण्याला नवे प्रभारी अधिकारी मिळाल्याने शहर व तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह गुन्हेगारीविरोधातील कारवाईला आगामी काळात आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!