नंदुरबारमध्ये पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाची लाट; आगामी वाटचालीवर सविस्तर मंथन

धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. विशेष वृत्तांत

नंदुरबार : भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा कार्यकारणीची बैठक आज बाबा रिसॉर्ट, नंदुरबार येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी काळातील पक्षाची वाटचाल अधिक प्रभावी करण्यासोबतच संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

बैठकीस आमदार राजेशदादा पाडवी, नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे, आगामी काळातील विविध राजकीय व संघटनात्मक उपक्रम तसेच कार्यकर्त्यांची भूमिका यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नेतृत्वाच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्यासाठी जोमाने काम करण्याचा संदेश बैठकीत देण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, कैलास चौधरी, बळीराम पाडवी, अॅड. सत्यानंद गावित, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, मोहनभाई खानवाणी, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत पाटील, शहादा नगरपालिका उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष समिधा नटावदकर, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस ऐजाज शेख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंकज पाठक, अजय वसावे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या.

बैठकीतून संघटनात्मक एकजुटीचा आणि आगामी वाटचालीसाठी सज्ज राहण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!