जळगाव जिल्हा प्रतिनिधी : निलेश खैरनार.

भुसावळ : श्री विश्वकर्मा सुतार समाज, भुसावळचे सुपुत्र स्वर्गीय वैभव पुरुषोत्तम दांडेकर यांचे आज पहाटे सुमारे १.३० वाजता कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी निधन झाले. महावितरणच्या डी. एस. हायस्कूल येथील कर्तव्यावर वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असताना ही हृदयद्रावक घटना घडली.

रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या दुःखद घटनेने दांडेकर परिवारासह संपूर्ण विश्वकर्मा सुतार समाजावर शोककळा पसरली आहे. कर्तव्य बजावत असताना वैभव दांडेकर यांच्यावर काळाने घातलेला हा घाला अत्यंत वेदनादायी ठरला.

त्यांच्या अकस्मात निधनामुळे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील तसेच तीन बहिणी आणि संपूर्ण दांडेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैभव यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी आणि समाजबांधवांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

कर्तव्याशी प्रामाणिक राहून सेवा बजावत असलेल्या वैभव दांडेकर यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचीच नव्हे तर सहकाऱ्यांची आणि समाजाचीही मोठी हानी झाली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!