अहिल्यानगर प्रतिनिधी : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या नूतन महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दीपक कांबळे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सौ. धनश्रीताई उत्पात, मुख्य महासचिव श्री. कमलेश शेवाळे तसेच उत्तर महाराष्ट्र सचिव श्री. शरद परदेशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यात सौ. पूजा काकडे यांची जिल्हा सचिव, तर सौ. कल्पना कोळसे यांची महिला जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच श्री. शंकरराव कवाने यांची जिल्हाध्यक्ष, श्री. आलम शेख यांची शहराध्यक्ष, श्री. गोवर्धन जगताप यांची राहुरी तालुकाध्यक्ष आणि श्री. विजय सोनवणे यांची राहुरी तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

यावेळी मुंबईचे श्री. संदीप वाघमारे, ठाण्याचे श्री. संतोष मिश्रा, अक्कलकोटचे श्री. चंद्रकांत देवपाठक, सोलापूरचे श्री. राजेंद्र राघोजी, खेडचे श्री. माने, सोलापूरच्या सौ. संपदा जोशी, पंढरपूरच्या सौ. शिल्पा म्हमाने आणि संगमेश्वरच्या सौ. प्रणिता घोलपे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनाही नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

वैभवीताई महाराजांच्या प्रभावी व्याख्यानाने रंगला सोहळा

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते महाराष्ट्र राज्य भूषण, शिवव्याख्याती व बाल कीर्तनकार ह.भ.प. वैभवीताई महाराज धनवट, देवाची आळंदी यांच्या प्रभावी व्याख्यानाचे. ‘स्वराज्य’ या विषयावर मार्गदर्शन करत त्यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विचारांची प्रेरणा दिली. त्यांच्या ओजस्वी वाणीतून उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प

पत्रकार संरक्षण, माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि समाजहितासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. संघटनेची ताकद ही पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीत असल्याचे सांगत संस्थापक अध्यक्ष श्री. दीपक कांबळे, प्रदेशाध्यक्ष सौ. धनश्रीताई उत्पात, मुख्य महासचिव श्री. कमलेश शेवाळे आणि उत्तर महाराष्ट्र सचिव श्री. शरद परदेशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटनेचा विचार पोहोचवून समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करा. संघटनेची ताकद पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीत आहे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

नूतन पदाधिकाऱ्यांनीही संघटनेची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे हा पदग्रहण सोहळा केवळ नियुक्तीचा कार्यक्रम न ठरता महाराष्ट्रभर संघटनात्मक विस्तार आणि समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!