जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

जळगाव : पर्यावरण संवर्धन आणि हरित जळगाव निर्मितीच्या दिशेने जळगाव जिल्हा पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जळगाव जिल्हा पोलीस दल व मॅरिको लिमिटेड, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस फायरिंग ग्राउंड येथे तब्बल १५०० झाडांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले.

दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जळगाव पोलीस फायरिंग ग्राउंड येथे आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि ‘हरित जळगाव’ निर्मितीचा संदेश देण्यात आला.

१५०० झाडांचे लागवड हे केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून, पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दिशेने जळगाव पोलिसांनी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. लागवड केलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित, जळगाव परिमंडळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड म. पो. से., मॅरिको लिमिटेडचे वर्क हेड रविंद्र चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तसेच स.फौ./अतुल वंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘हरित जळगाव… समृद्ध जळगाव!’ या संकल्पनेतून पर्यावरणपूरक आणि सुंदर जळगाव घडविण्यासाठी नागरिकांनीही वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

‘झाडे लावा… झाडे जगवा… पर्यावरण वाचवा… भविष्य घडवा!’ या संदेशातून जळगाव पोलिसांनी पर्यावरण संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!