मराठवाडा विभागीय प्रतिनिधी
घनसावंगी : घनसावंगी तालुक्याचे कृषी अधिकारी डॉ. सखाराम निवृत्ती पवळ यांची परतूर येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांच्या या निवडीबद्दल भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, जालना जिल्हाध्यक्ष तथा स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूज मराठवाडा प्रतिनिधी अनिरुद्ध साबळे तसेच श्रीराम गोपने, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन तालुका अध्यक्ष व स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूज प्रतिनिधी, घनसावंगी यांच्या वतीने डॉ. पवळ यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
डॉ. पवळ यांनी कृषी विभागातील कार्यकाळात शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले. त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल उपस्थितांनी शुभेच्छा देत, परतूर येथेही त्यांच्या कार्याचा शेतकरी बांधवांना मोठा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी डॉ. पवळ यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
