जळगांव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

चोपडा, दि. १७ : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (जळगाव पूर्व) च्या वतीने आयोजित संघटनात्मक आढावा बैठकीच्या निमित्ताने चोपडा येथे आगमन झालेल्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार सौ. चित्राताई वाघ यांचा चोपडा येथील सुवर्णकार (सोनार) समाजाच्या वतीने भावुक व उत्साही वातावरणात भव्य नागरी सत्कार व गौरव करण्यात आला.

सौ. चित्राताई वाघ या सुवर्णकार समाजाची लेक असून त्या समाजासाठी आदर्श आणि अभिमानास्पद महिला भगिनी आहेत, या भावनेतून सुवर्णकार समाज बांधवांनी त्यांचा गौरव केला. या प्रसंगी समाजाच्या वतीने त्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ अर्पण करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विलास सोनार सर, उपाध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव डॉ. विजय जाधव, अनिल वानखेडे, रवीभाऊ सोनार, भटू विसपुते, गौरव अहिरराव, स्वप्नील पोतदार, श्री. श्रीराम सोनार, विनोद सोनार, जितेंद्र विसपुते, राकेश विसपुते, मनोज सोनार यांसह समाजाचे इतर प्रमुख पदाधिकारी तसेच सुवर्णकार महिला मंडळाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आढावा बैठकीत महिला संघटन बळकट करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर सखोल चर्चा झाली. समाजाची लेक म्हणून सुवर्णकार समाजाने दाखवलेले प्रेम, आदर आणि केलेल्या सत्काराबद्दल आ. सौ. चित्राताई वाघ यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!