धुळे शहरात महत्वपूर्ण बैठक; १४ ऑगस्टच्या तिरंगा रॅलीत मोठ्या सहभागाचा निर्धार

धुळे जिल्हा प्रतिनिधी – प्रमोद बोरसे

धुळे : शहरात SIR अभियान, ‘हर घर तिरंगा’ अभियान आणि तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली. आगामी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यासह जनसंपर्क आणि अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

१४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवी दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी तिरंगा रॅली भव्य आणि ऐतिहासिक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश घराघरात पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या महत्वपूर्ण बैठकीस माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!