जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.

अंतुर्ली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधव नितेश रामदास जांभेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एस. ए. भोई सर होते. यावेळी पोलीस पाटील किशोर मेढे, माजी प्राचार्य बी. डी. बारी, शरद महाजन, भाऊराव महाजन, राजू शिरतुरे, अजय भिल्ल, सुमित सील्वे, महेंद्र चौधरी, प्रकाश कोळी, मिलिंद महाजन, शेख भैय्या शेख करीम, अरविंद पाटील, गणेश पाटील यांच्यासह वाचक, मान्यवर व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना एस. ए. भोई सर म्हणाले की, “आदिवासी समाजाचा इतिहास हा केवळ संघर्षाचा नसून शौर्य, स्वाभिमान आणि समृद्ध संस्कृतीचा इतिहास आहे. जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षण करणारा आदिवासी समाज निसर्गाचा खरा मित्र आहे.” आदिवासी समाजाची संस्कृती, भाषा, परंपरा व हक्क जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाचे पर्यावरण संवर्धन, निसर्ग संरक्षण, संस्कृती व परंपरांचे जतन तसेच स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यावरही त्यांनी प्रकाश टाकला. “शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक अनिल वाडीले, ग्रंथपाल अनिल नावकर आणि किरण धायले यांनी विशेष प्रयत्न केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!