

नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान.
नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
खांडबारा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात खांडबारा गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच एम ई सी बी येथे जे ई गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रकाश कोकणी, सोमनाथ कोकणी, राऊत साहेब, लालू कोकणी, रामदास पवार, आदी उपस्थित होते.
अग्रीकल्चर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे संस्थेचे चेअरमन डॉ. सत्यवान नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना सायकली वाटप तसेच संविधान परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, देण्यात आले. याप्रसंगी शिक्षक आजी माझी विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते.
खांडबारा पोलीस दूरक्षेत्र येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौरे, यांच्या हस्ते तर खांडबारा ग्रामिण रुग्णालयात येथे डॉ सखाराम वळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषद मराठी शाळा येथे खांडबारा गावाचे लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी खोखो कबड्डी असे विविध स्पर्धेत भाग घेतलेले विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली.
याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.
