
नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान.
इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे दिनांक 25 जानेवारी शनिवारी रोजी अबुलगाजी नगर येथे मतदार दिन कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष एजाज भाई बागवान यांच्या अध्यक्षतेखाली अति उत्साहात संपन्न

नंदुरबार येथील अबुलगाजी नगर येथे राष्ट्रीय मतदार दिन असल्याने नव तरुण मतदारांना लोकशाही परकीयेतष सामील होण्यासाठी प्रेरित करण्यात आले व ज्या ज्या लोकांनी आपल्या मतदार कार्ड दुरुस्तीसाठी दिलेल्या होत्या त्या सर्व जागृत नागरिकांना मतदान कार्ड इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज भाई बागवान यांचे हस्ते देण्यात आले यावेळी अध्यक्षीय भाषणात एजाज भाई बागवान यांनी आपले मनोगतात सांगितले की लोकशाहीच्या परबळतेसाठी आपला हक्क व आपला अधिकार बजवून जागरूक व सुजान मतदार बनण्याच्या सर्वांनी संकल्प करूया ह्यावेळी BLO-356 बासीत मुस्लिम खान यांनी अतिशय चांगली कामगिरी म्हणून मतदान कार्ड घरोघरी जाऊन मतदान कार्ड वाटप केले विशेष ज्या लोकांचे पत्ते घर बदलणे वरही शोधून मतदान कार्ड वाटप केलेले म्हणून BLO-356 बासित मुस्लिम खान यांच्या यावेळी गुलाब पुष्प देऊन त्यांच्या सन्मान सत्कार करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हाजी कमरोद्दिन खाटीक, अब्दुररहमान पठाण, खाटीक रियाज, खाटीक मुस्तकीम, ज़क्वान काझी, तय्यब शेख, नमीर खान आदींची उपस्थिती होती.
