जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ. ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दि.८ ऑगस्ट रोजी क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सचिन देशपांडे, जेष्ठ पर्यवेक्षक मा. श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, ज्येष्ठ शिक्षिका सौ पद्मजा जोशी,सौ.प्राजक्ता गोहिल, सौ.रोहिणी प्रचंड व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता, थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या प्रसंगी क्रांतीदिनाचे महत्त्व आपल्या प्रास्ताविकातून सौ. रोहिणी प्रचंड यांनी सांगितले, कार्यक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते, या वेळेस विद्यार्थांनी क्रांतिकारक मंगल पांडे, राजगुरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, इंग्रज अधिकारी, यांच्या वेशभूषा साकारून भाषणे, देशभक्तीपर गीत, नाटिका,नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यकमाच्या अंती शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सचिन देशपांडे सरांनी आपले मनोगत व्यक्त करून देश स्वातंत्र्य लढ्याची माहिती देऊन क्रांतिकारकांच्या प्रति अभिवादन व्यक्त केले.तसेच विद्यार्थांनी देशाभिमान बाळगून देशविकासात भरीव योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभाग शिक्षक सौ. रेवती किन्हीकर, सौ. संगिता कुळकर्णी, सौ. मनिषा पवार यांनी तसेच शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ज्वल साळुंखे व प्रथमेश माळी या विद्यार्थ्यांनी तर आभार प्रदर्शन कृष्णा तांबट याने केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभाग शिक्षक सौ.रोहिणी प्रचंड,सौ.रेवती किन्हीकर,सौ संगीता कुलकर्णी, सौ.मनिषा पवार, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!