जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी दुपार २ वा. भारत विकास परिषद, जळगाव ( महाराष्ट्र उत्तर प्रांत ) यांच्या तर्फे “गुरु वंदन -छात्र अभिनंदन “हा संस्कारक्षम स्तुत्य उपक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. हेमांगिनी महाजन यांनी भारत विकास परिषदेची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सचिन देशपांडे यांनी मा. श्री. तुषार तोतला ( शाळेचे माजी विद्यार्थी तथा क्षेत्रीय सचिव सेवा गतीविधी ) सौ. कविता कोटस्थाने ( सदस्या ) यांचे स्वागत केले तर सौ. हेमांगिनी महाजन यांचे स्वागत पर्यवेक्षिका मा. सौ. रमा तारे यांनी केले. तुषार तोतला यांनी विद्यार्थ्यांना गुरु -शिष्य परंपरा या बद्दल माहिती दिली तसेच गुरुबद्दल आदर व्यक्त करावा, त्यांचा सन्मान करावा हा संदेश दिला.

“गुरु वंदन -छात्र अभिनंदन “या कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरूपात पाच शिक्षक व पाच विद्यार्थी यांना भेटवस्तू व पदक देण्यात आले श्री. सोमनाथ महाजन, श्री. आनंद पाटील, सौ. पद्ममजा जोशी, सौ. प्राजक्ता गोहिल, सौ. रोहिणी प्रचंड या ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला तसेच केतन कपाटे, प्रसाद जैन, विनय पाटील, रेणुका जोशी, टिशा नेहते, या विद्यार्थ्यांना भेटवस्तू व मेडल देण्यात आले.

सौ. पद्ममजा जोशी यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रसाद जैन या विद्यार्थ्याने देखिल गुरुप्रती आपल्या मनोगतातून आदरभाव व्यक्त केला. सौ. कविता कोटस्थाने यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, संस्कार, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती बाबत सामुदायिक शपथ दिली. विद्यार्थांनी ‘भारत को जाणो ‘ या उपक्रमात सहभागी होऊन उज्वल यश संपादन करण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेवती किन्हीकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. मधुश्री मदाने यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर श्री. तुषार तोतला ( क्षेत्रीय सचिव सेवा गतिविथी ) सौ. हेमांगिनी महाजन ( प्रांत कोषाध्यक्ष ) श्री. विकास चौधरी ( शाखा सहसचिव ) श्री. दिपक सेठ ( कार्यकारणी सदस्य ) सौ. कविता कोटस्थाने (सदस्या) सौ. जागृती सेठ ( सदस्या ) सौ. गौरी तोतला ( सदस्या ) सौ. अश्विनी शिंदे ( महिला गतिविधी प्रमुख ) शेठ ला. ना. सा. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. सचिन देशपांडे, जेष्ठ पर्यवेक्षक मा. श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका मा. सौ रमा तारे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक श्री. जे. आर. साळुंखे, श्री. श्रीकांत घुगे तसेच शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!