जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

अमळनेर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या आपत्तीमुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, व्यापारी भागातील दुकाने तसेच धान्य गोदामांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ठिबक सिंचन व्यवस्था, पाईपलाइन व अन्य शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे.

 

पूरग्रस्त नागरिक, व्यापारी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्तांना शासनाच्या नियमांनुसार तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच पूरग्रस्तांच्या घरांचे, व्यापारी आस्थापनांचे तसेच शेतकऱ्यांच्या शेती पिके व शेती साहित्याच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने, अचूक व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून मदत प्रस्ताव शासनाकडे त्वरीत पाठविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!