बहाळ, खेडगाव आणि भवाळी परिसरातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; दिलेला शब्द पाळत मदतीचा हात पोहोचला प्रत्येक कुटुंबापर्यंत

चाळीसगाव | प्रतिनिधी : अतुल माळी

अतिवृष्टीमुळे बहाळ, खेडगाव आणि भवाळी परिसरातील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांच्या संसाराची घडी विस्कटली आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी मदतीचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करून संकटग्रस्तांना मोठा दिलासा दिला.

या मदतवाटपामुळे पूरग्रस्त कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध झाल्या असून संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. स्थानिक नागरिकांनीही या मदतकार्याचे स्वागत करत त्यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले.

संकटाच्या काळात केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीतून मदतीचा हात पुढे करणारे नेतृत्व म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांची पुन्हा एकदा ओळख अधोरेखित झाली आहे. पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य फुलविण्याचा हा प्रयत्न परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!