जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पर्यावरण समितीच्या वतीने शाळा परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या अंतर्गत कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा, ई-कचरा आणि घातक कचरा अशा चार गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याची माहिती देऊन योग्य कचरापेटीत कचरा टाकण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणासाठी प्रत्येकाने कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे आवश्यक आहे. शाळेपासून सुरू झालेली ही सवय विद्यार्थ्यांमार्फत समाजातही पोहोचेल.”

या उपक्रमासाठी पर्यावरण समितीचे सदस्य, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शाळा परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक मुकेश नाईक ,पर्यावरण समिती प्रमुख श्रीमती उज्वला नन्नवरे, समिती सदस्य व सर्व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. 🌱♻️🌍

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!