जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
चोपडा शहरातील स्वच्छता व नागरिक सुविधा सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आज नगर परिषद हद्दीतील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहिमेअंतर्गत विशेष पाहणी करण्यात आली. या पाहणीचे नेतृत्व लोकनियुक्त नगर अध्यक्ष सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांनी केले.

यावेळी उपनगराध्यक्ष पंकज भैया बोरोले, फरमान दादा मिस्त्री, अकीलभाई जहागिरदार, स्वच्छता विभागाच्या दिपाली मॅडम साळुंखे, भोगे साहेब, पाणीपुरवठा विभागाचे मोरे साहेब, बांधकाम विभागाचे सचिन देसले साहेब तसेच सचिन भाऊ पाटील, दीपक चौधरी व प्रदीप बारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व इतर नागरी सुविधा संबंधित विविध समस्या नगर अध्यक्षांसमोर मांडल्या. प्रत्येक समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नगर अध्यक्ष सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आणि समस्यांचे निवारण लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले.

नगर अध्यक्षांच्या या सक्रिय व तत्पर भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त झाले. उपस्थित नागरिकांनी नगर अध्यक्ष सौ. नम्रता ताई सचिन पाटील तसेच सहभागी पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि स्वच्छ व सुंदर चोपडा शहर निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला.

ही मोहीम शहरातील स्वच्छता अभियानाला नवीन गती देणारी ठरली असून नगर परिषदेच्या वतीने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण प्राधान्याने करण्याचे धोरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
