माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. सविताताई जयस्वाल प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाअध्यक्ष यांच्या सहकार्याने सौ. संध्या नरेश महाजन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका यांच्या नेतृत्वात अडावद येथे देवाभाऊ कृषी माऊली सोहळा उत्साहात संपन्न.

जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष सौ. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश महिला मोर्चा सचिव सौ. सविताताई जयस्वाल यांच्या सहकार्याने महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा चोपडा नगरपरिषद नगरसेविका सौ. संध्या नरेश महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव पूर्व मतदारसंघातील चोपडा तालुक्यातील अडावद येथे “देवाभाऊ कृषी माऊली सोहळा” उत्साहात पार पडला.

या ऐतिहासिक वाढदिवसानिमित्त राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर झाल्याच्या पाश्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर प्रदेश प्रभारी माननीय सविता जयस्वाल, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. संध्या नरेश महाजन, मुख्य मार्गदर्शक कृषी अधिकारी दिनेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम आबा पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर दादा पाटील, महामंत्री राकेश दादा पाटील, जिल्हा सरचिटणीस हनुमंत तात्या महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषी अधिकारी दिनेश पाटील यांनी उपस्थित शेतकरी महिलांना पिकांवर योग्य फवारणी, रोगराई नियंत्रण, सेंद्रिय शेतीची पद्धत, शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे मार्ग आणि महिलांना शेतीत कशाप्रकारे सक्षम करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अडावद गावातील सर्व शेतकरी महिलांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुपीक माती, शेती तंत्रज्ञान आणि आरोग्यदायी सेंद्रिय शेतीबाबत त्यांना उपयुक्त माहिती मिळाली.

शेतात मध्यपिक म्हणून भाजीपाला लागवड करून महिलांना आत्मनिर्भर बनता येईल, तसेच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादित केल्यास आरोग्याला होणारे फायदे याबाबतही सविस्तर चर्चा झाली. यावेळी १०० शेतकरी महिलांना कृषी किट देऊन त्यांचे ओटी भरण्यात आले. उपस्थित महिलांनी लाडक्या देवाभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

कार्यक्रमास महामंत्री राकेश दादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम आबा पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर दादा पाटील, जिल्हा सरचिटणीस हनुमंत तात्या महाजन, नरेश महाजन, जितेंद्र महाजन, तालुकाध्यक्ष पिंटू भाऊ पावरा, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ. भारती चित्ते, नंदुरबार महिला मोर्चा शहराध्यक्ष सरिता चौधरी व ममता गोसावी, ग्रामपंचायत सदस्य पंकज महाजन, संदीप महाजन, कमलेश चौधरी, बी. के. देशमुख, एस. जी. महाजन, प्रभाकर महाजन, भूषण पंचोली, लताताई खैरनार, भाग्यश्री चौधरी यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, सौ. सविताताई जयस्वाल यांच्या सहकार्याने आणि सौ. संध्या नरेश महाजन यांच्या सक्रिय नेतृत्वात आयोजित हा कार्यक्रम शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण महिलांना शेतीत स्वयंपूर्ण बनविण्याचा संदेश देणारा हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!