चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
पंढरपूर येथे सायकलवारी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अस्थापना विभागप्रमुख श्री. संदीप गायकवाड साहेब यांचा नगरपरिषदेमार्फत विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. नम्रता ताई पाटील होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष पंकजभैया बोरोले, उपमुख्याधिकारी माननीय मिसर साहेब, नगरसेवक-नगरसेविका, सचिनभाऊ पाटील तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
सायकलवारी हा केवळ शारीरिक श्रमाचा उपक्रम नसून सामाजिक बांधिलकी, आरोग्यप्रेम आणि अध्यात्माचा सुंदर संगम असल्याचे उपस्थित मान्यवरांनी अधोरेखित केले. श्री. संदीप गायकवाड यांनी पंढरपूरसारख्या पावन स्थळी सायकलवारी यशस्वीरीत्या पूर्ण करून तरुण पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
नगराध्यक्ष सौ. नम्रता ताई पाटील यांनी या उपक्रमाला सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरवताना श्री. गायकवाड यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांनीही त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची प्रशंसा करून भविष्यातील अशा उपक्रमांना यश मिळो, अशी इच्छा व्यक्त केली.
