नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान.

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा ता. नवापूर येथील कै. सुमन बारकु वाघ कला व विज्ञान महाविद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष मुकुंद रामराजे यांच्या अध्यक्षते खाली व संस्थेचे प्राचार्य मा. पाटोळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमास विशेष प्रमुख पाहुणे म्हणून खांडबारा गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित, उद्योगपती तथा गटनेते राजेंद्र अग्रवाल, जामा मस्जिद ट्रस्टचे सचिव शरीफ बागवान, सुनील भामरे मा. मुख्याध्यापक, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आर. बी. वाघ, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज चौधरी, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, पुरुषोत्तम अहिरे, आणि सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष नियोजन समन्वयक डी. के. बोरसे सर व त्यांना शिक्षक आणि कर्मचारी यांनी अगदी यथायोग्य असे सहकार्य केले.


यात मेधा योगेश पाटील F.Y.BSc मध्ये प्रथम श्रेणीत पास झाल्यामुळे सत्कार करण्यात आला.


उपप्राचार्य बोधीपाल लोडे यांनी सूत्रसंचालन केले त्यांना नवीन वयावे, प्रा. संतोष गावित, प्रा. हितेश गावित, प्रा. मानसी मंडली, प्रा. सोनाली गावित, वृषाली वडवी आदी सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!