
नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान.
नंदुरबार जिल्ह्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक २२ /०१/२०२५ रोजी पार पडली, या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा विखरण केंद्र खोंडामळी या शाळेेने त्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. भाले फेक मध्ये कल्पेश विठोबा भील याने सर्वात जास्त १२.५० मीटरचा भाला फेकून प्रथम क्रमांक मिळवला व त्याची पूढे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत निवड झाली आहे. व गोळा फेक स्पर्धेत लावण्या पंकज पाटील हिने दुसऱा क्रमांक मिळवला. त्यांचे मनापासून अभिनंदन व त्यामागे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे खोंडामळी केंद्राचे केंद्रप्रमुख करनकाळ सर मुख्याध्यापक वाघ सर व महेंद्र ईशी सर यांचे ही हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
